Dictionaries | References उ उपलवणें Script: Devanagari See also: उपलविणें Meaning Related Words उपलवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. प्रसार ; विस्तार . मौक्तिकां चिआं वेलीं फुललिया । कीं क्षीरसागरां लहरी उपलवलियां । - शिशु ५९२ .विवेचन , विस्तार , व्याख्यान , वर्णन करणें . हेचि आनि भांती । प्रमेय उपलवूं पुढतीं । परी तूं प्रतीती । याचि घे पां । - ज्ञा १४ . ८६ .फुलणें ; उकलणें ; फुलविणें ; विकास करणें . साहित्याचिए सेजें । बोलांचा रंगु उपलविजे । - शिशु २४ . जैसी चंद्रमयाची घडी । उपलविली । - ज्ञा ११ . २२३ .व्यक्त होणें . तेथें जाणो कोटी सूर्य घडीं उपलविली चोखडी । तैसी तेजपरवडी । श्यामांग चतुर्भुज । - स्वादि १० . ३ . १३ .प्रसन्न होणें . तेणें हरिखें आतां उपलवला निरुपील । - ज्ञा ६ . ४८८ . [ सं . उत + प्लु ; उप + प्लु ; उत्प्लवन किंवा उपप्लवन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP