Dictionaries | References

अनुवादन

   
Script: Devanagari
See also:  अनुवाद

अनुवादन     

 पु. न .
( सभेमध्यें ) दुसर्‍याचें बोलणें किंवा स्वत : चें म्हणणें पुन : पुन : सांगणें किंवा मांडणें ; पुन्हा स्पष्टीकरण ; स्पष्टीकरणार्थ पुनरुक्ति .
एखाद्यावरचा शाबीत झालेला आरोप सर्वांस सांगून त्याला दिलेलें शासन पुन्हां सांगणें .
दुसर्‍याचीं दुष्कृत्यें उघडकीस आणणें .
द्विरुक्ति ; वरचेवर तेंच सांगणें . पुनरुक्ति ; पाठ . हेचि अनुवाद सदासर्वकाळ । करुनि गोपाळकाळा सेवूं ॥ - तुगा २४२ . ( ल . ) वर्णन करणें . एकां गुणानुवादु करितां । उपरति होऊनि चित्ता । - ज्ञा २ . १७३ .
( व्यापक . ) संवाद ; संलाप ; भाषण . दोहींचा अनुवाद परिसाय जे ।
( धर्म ) प्रायश्चित घेतेवेळीं पातकांचा व प्रायश्चिताचा उच्चार करणें .
( कायदा ) सिध्द करणें . प्रस्थापित करणें . ( जुनी रीत , रिवाज वगैरे ).
( ल . ) भाषांतर ; नक्कल ( ग्रंथ , काव्य वगैरे )
( तत्त्व . ) अर्थ व वेदांतील वर्णन वस्तुस्थितीस धरुन असेल तर त्यास अनुवाद म्हणता . - गीर २२ .
दुजोरा . [ सं . अनु + वद = बोलणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP