Dictionaries | References

अनुकूळ

   
Script: Devanagari
See also:  अनुकूल

अनुकूळ     

वि.  
फायदेशीर ; उपकारी ; सहाय्यक ; धार्जिणा ; शुभ ; कल्याणप्रद ; हितकर ; हितावह ; योग्य ; मनाच्या आवडीप्रमाणें असलेला . पूर्वेकडे गमनास पश्चिमवायु अनुकूल होतो .
जुळणारा ; जमणारा ; संमत ; अनुसरुन असणारा . मीमांसामत धर्मशास्त्रास अनुकूल आहे .
तयार ; हातांत , ताब्यांत , हुकमतींत असणारा . ( पैसे , धान्य वगैरे ). अनुकूल स्त्रियापुत्र । अ० मंत्री पवित्र । अ० राज्य सर्वत्र । भोगिले विचित्र नानाभोग ॥ - एभा २ . १४३ . - न . योग्य परिस्थिति ; सहाय्यक परिस्थिति ; अनुकूलता ; सोईस्करपणा . ( प्रतिकूल याच्या उलट ). यंदा काशीस जाण्याचें आम्हांस अनुकूल नाहीं ; सारीं माणसें घरीं दुखणाईत आहेत . [ सं . ] - ता - स्त्री .
ऐपत ; सामर्थ .
संमति . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP