Dictionaries | References

अडीच कांड्यावर येणें

   
Script: Devanagari
See also:  अडचा कांड्यावर येणें

अडीच कांड्यावर येणें     

गव्हाच्या ताटास ओंबी येते तेव्हां अडीच पेरे असतात. यावरून फुटून बाहेर पडण्याच्या बेतास येणें
अगदीं पूर्णतेच्या जवळ येणें, समीप ठेपणें
( ल.) अतिशय उतावीळ होणें
कोणतीहि गोष्‍ट शेवटास पोचण्याच्या बेतास येणें
परमावधीस पोचणें
घाईस येणें. गव्हाचें रोप अडीच कांडीं वाढलें म्हणजे पोटरीस येतें व त्यांतून ओंबी बाहेर पडण्याची वेळ येते यावरुन कोणतीहि गोष्ट पूर्ण होण्याच्या बेतांत येणें व अशावेळीं साधारणतः घाई असते म्हणून एखादा मनुष्य अगदीं उतावीळ होणें.
चिडण्याच्या, रागावण्याच्या बेतास येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP