Dictionaries | References अ अखंडी Script: Devanagari See also: अखंड Meaning Related Words अखंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. संपुर्ण ; सगळा ; अत्रुटित .तुकडे नसलेला ; एकसंधी ; सलग ; तुकडे जोडून न केलेला . - क्रिवि . सतत ; अप्रतिबध्द ; न थांबतां ; निरंतर . अखंड बोलो आवडे । - ज्ञा १५ . ४४८ . [ सं . अ + खंड ].०क्रम पु. पत्त्याच्या बिझिक ( पाट ) च्या खेळांत हुकमाच्या एक्क्यापासून दहिल्यापर्यंतची एकसारखी रांग ( सीक्वेन्स ); यास २५० मार्क असतात . - पाट १६ .०चोळी स्त्री. बाह्याविना सर्व सलग अवयवांची - लाग , पखे , ठुशा ( कोरा ) व पाठ - जोड नसलेली चोळी .०दंड वि. एकसारखा चालणारा , असणारा . शत वर्षे अखंड दंड । पर्जन्य वितंड पैं वर्षे ॥ - एभा . ३ . १६८ .०दंडायमान वि. अमर्याद ; अनंत ; घटका , पळें , दिवस , वर्षे इ० कालविभागविरहित .०द्वादशी स्त्री. मार्गशीर्ष शुध्द द्वादशी .०पद ( ग . ) बीजगणितांतील मूळ प्रकाशक नसलेलें अकरणी पद .०श्रेढी स्त्री. ( ग . ) गणितांतील एक श्रेढीप्रकार ; यांतील पदें क्रमानें खंड न पडतां एकसारखीं असतात .०सौभाग्य न. अव्याहत , एकसारखी , सतत भरभराट - ऐश्वर्य - कल्याण .केव्हांहि वैधव्य प्राप्त न होणें ; नवर्याच्या आधीं मरणें . [ सं . ]०सौभाग्यवती स्त्री. जिला सतत सौभाग्यसुख लाधलें किंवा लाधणार आहे अशी स्त्री ; अविधवा .( ल . ) वेश्या .०स्वारी स्त्री. सर्व लवाजम्यासहित . अखंड स्वारी रायाची निघाली चौथीच्या अमलामधीं - प्रला . ३०९ .०ज्ञान न. सतत ज्ञानमय स्थिति ; स्थिर शुध्दि .संयोजीकरणानें होणारें ज्ञान . खंडज्ञान पहा . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP