|
चहा कुल, थीएसी चहा (थीया) कॅमेलिया (गॉर्डाएनिया) नागेट्टा इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा अंतर्भाव एंग्लर व प्रँटल यांनी पराएटेलीझमध्ये (तटलग्न बीजकाधानी असलेल्या गणात) बेंथॅम व हूकर यांनी कोकम (वृंदार) गणात व हचिन्सननी चहा गणात (थीएलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- साध्या, चिवट, एकाआड एक पानांच्या काष्ठयुक्त वनस्पती, द्विलिंगी, अंशतः सर्पिल फुले, संदले ५-७, नियमित, दीर्घकाल राहणारी, पाकळ्या बहुधा ५- किंवा अनके व सुट्या, क्वचित खाली जुळलेल्या, केसरदले अनेक, क्वचित कमी वा जास्त (५-१०-१५) सुटी किंवा जुळलेली, किंजदले जुळलेली ३- किंवा ते अनेक व ते अनेक बीजके (अक्षलग्न) बोंडात अनेक बिया. ternstroemiaceae
|