|
धोतरा (धोत्रा) कुल, सोलॅनेसी वांगे (वृत्तांक) बटाटा, टोमॅटो, मिरची, धोतरा, तंबाखू, अश्वगंध, रिंगणी इ. वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव बेसींच्या पद्धतीत पोलेमोनिएलिझ गणात व हचिन्सन यांच्य मते धोतरा गणात (सोलॅनेलीझ मध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- धोतरा कुलातील वनस्पती औषधीय किंवा झुडपे असून पाने साधी व एकाआड एक फुले नियमित, अरसमात्र, द्विलिंगी आणि पंचभागी, संवर्त बहुधा दीर्घस्थायी किंवा सहवर्धिष्णु, पुष्पमुकुट जुळलेल्या पाकळ्यांचा, केसरदले पाच आणि पाकळ्यास तळाशी चिकटलेली, ऊर्ध्वस्थ, दोन किंजदलांचा किंजपुट आणि फळ मृदु किंवा शुष्क (बोंड) असते. या कुलाला वृंत्ताक कुल असेही म्हणतात कारण वृंत्ताक (वांगे) ज्या वंशात घातले आहे तो वंश (सोलॅनम) प्रमुख आहे.
|