|
कलश (घट) पर्णी गण, सॅरारेनिएलीझ एंग्लर व प्रँटल यांनी हा गण आर्किक्लॅमिडी गटात समाविष्ट केला असून हचिन्सन यांनी हर्बेसीत घातला आहे. प्रमुख लक्षणे- साधी, एकाआड एक, कीटक भक्षक अवयवात (घट, कलश, चंबू) रुपांतर पावलेली पाने असलेल्या लहान औषधी, फुले नियमित, अवकिंज चक्रीय ते अर्धचक्रीय (अर्धसर्पिल) परिदले सर्व सारखी किंवा संवर्त व पुष्पमुकुट स्पष्ट व अलग. ३- ऊर्ध्वस्थ, जुळलेल्या किंजदलांच्या किंजपुटात तीन ते अनेक बीजके, फळे विविध व बीजे सपुष्क. या गणात सॅरासेनिएसी, नेपेंथसी व ड्रॉसेरेसी ही तीन कुले घालतात. हचिन्सन यांनी नेपेंथेसीचा अंतर्भाव सापसंद गणात (ईश्वरीगमात, ऍरिस्टोलेकिएलीझमध्ये) केला आहे. कीटकभक्षक वनस्पती (insectivorous plants) Nepenthaceae.
|