|
कांदल कुल, ऱ्हायझोफोरेसी पांशी, कांदल, कांकरा, चौरी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश जंबुल गणात (मिटेंलीझ) केला जातो. प्रमुख लक्षणे- समोरासमोर व उपपर्णे असलेल्या पानांची झाडेझुडपे, द्विलिंगी, अवकिंज ते अपिकिंज, नियमित फुले, संदले ४-८, पाकळ्या ४- सुट्या, केसरदले ते अनेक व बिंबावर आधारलेली, २- ऊर्ध्वस्थ किंजदले (जुळलेली) किंजपुटात २- कप्पे व प्रत्येकात बीजुके, मृदुफळ Myrtaceae Combretaceae.
|