|
बदरी (बोर) कुल, ऱ्हॅम्नेसी बोर, तोरण इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश बेसी आणि बेंथॅम व हुकर यांनी ज्योतिष्मती गणात (सीलॅस्ट्रेलीझमध्ये) व एँग्लर व प्रँटल यांनी बदरी गणात (ऱ्हॅम्नेलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- काष्ठयुक्त (झुडपे व वृक्ष) वनस्पती, काही वेली, पाने साधी, व एकाआड एक, लहान उपपर्णे, फुले, लहान, हिरवट किंवा पिवळट, संदले ४-५, पाकळ्या सुट्या, ४- किंवा नसतात, पाकळ्यासमोर ४- केसरदले, किंजदले ऊर्ध्वस्थ ते अधःस्थ, २- व तितकीच बीजके, फळ शुष्क किंवा आठळीयुक्त celastraceae.
|