|
संघ वर्गीकरण पद्धतीत पूर्वी संबंधित जीवांच्या फार मोठ्या गटास ही संज्ञा उपयोगात असे, हल्ली प्राणिशास्त्रात ती वापरतात परंतु वनस्पतिशास्त्रात तिच्याऐवजी काही शास्त्रज्ञ विभाग (division) ही संज्ञा वापरतात, सर्वसाधारणपणे संघाचे अथवा विभागाचे अनेक वर्ग, वर्गाचे गण व गणांची कुले असे भाग पाडतात. तथापि उपकुले, उपविभाग, उपवर्ग, गोत्रे, श्रेणी असे लहान भागही पाडले जातात. जाती हे शेवटचे एकक असून संबंधित जातींचा एक वंश मानतात. ह्या सर्व एककांमध्ये नैसर्गिक व जातिविकासाच्या दृष्टीने नाते (आप्तभाव) असल्याचे मान्य करून वर्गीकरण केले जाते. अद्याप भिन्न शास्त्रज्ञांत तपशिलाबाबत एकमत नाही. विभाग ही संज्ञा phyta या प्रत्ययाने दर्शविलेल्या गटांना काही शास्त्रज्ञ वापरतात. Thallophyta Bryophyta Pteridophyta
|