|
अहिफेन कुल, पॅपॅव्हरेसी अफू, पिवळा धोतरा (काटे धोतरा) पॉपी इत्यादी (द्विदलिकित) वनस्पतींचे कुल याचा अंतर्भाव (पॅपॅव्हरेलीझमध्ये ) अहिफेन गणात करतात. हचिन्सन यांनी ऱ्हीडेलीझमध्ये आणि बेथँम व हूकर यांनी पराएटेलीझमध्ये हे कुल घातले आहे. प्रमुख लक्षणे- एकाआड एक पाने व चीक असलेल्या औषधी, पाकळ्या ४- क्वचित नसतात, संदले२, केसरदले २ किंवा अनेक, किंजदले ते अनेक, जुळलेली, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व तटलग्न बीजकाधानी, बीजके अनेक, बोंड किंवा कपाली प्रकारचे फळ, बीजे सपुष्क
|