|
कमल कुल, निम्फिएसी कमळे, महापद्म इत्यादींचे द्विदलिकित फुलझाडांचे कुल. याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- पाण्यात किंवा दलदलीत वाढणाऱ्या औषधीय वनस्पती, तरंगणारी किंवा बुडून राहणारी पाने, मोठी आकर्षक, नियमित, द्विलिंगी, एकाकी, फुले, देठ पोकळ, परिदले सहा ते अनेक, सुटी, केसरदले सुटी सहा ते अनेक, किंजदले सुटी किंवा जुळलेली, तीन ते अनेक, ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ, मृदुफळातील बियांना बीजोपांग बहुधा असते., पुष्क व परिपुष्क कधी कधी असते. नीलंबियम, निंफिया, केंबोम्बा, नूफर, यूरेल, व्हिक्टोरिया इत्यादी वंशनामे आहेत. हल्ली कॅबोम्बेसी, निलंबिएसी व निम्फिएसी अशी तीन कुले केली आहेत.
|