|
जातिफल (जायफळ) कुल, मिरिस्टिकेसी जायफळाच्या झाडाचा अंतर्भाव असलेले लहान द्विदलिकित कुल, याचा समावेश मोरवेल गणात (रॅनेलीझमध्ये) एंग्लर व प्रँटल आणि बेसी यांनी केला आहे. प्रमुख लक्षणे- झुडपे किंवा वृक्ष, पाने साधी एकाआड एक, सतत हिरवी व तैलप्रपिंडयुक्त. एकलिंगी, नियमित, विभक्त झाडांवर, लहान फुले येतात, परिदले जुळलेली, केसरदले ३-१ व जुळलेली, एका किंजदलाच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक बीजक, मांसल फळ तडकते, बियाला बीजोपांग असते. पुष्क रेषाभेदित. हचिन्सन यांनी हे कुल ऍनोनेलिझ (सीताफल गण) मध्ये घातले आहे. Knema attenuata (Wall) Warb Ranales.
|