|
गुडूची कुल, मेनिस्पर्मेसी गुळवेल (गुडूची) वसनवेल, काकमारी,पहाडवेल इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश मोरवेल गणात (रॅनॅलीझमध्ये) केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- लहानमोठ्या वेली, झुडपे व वृक्ष, एकाआड एक साधी पाने, एकलिंगी, विभक्त वनस्पतीवर, बहुधा विखुरलेली, नियमित, लहान, फिकटरंगी, त्रिभागी फुले, किंजदलाखेरीज इतर पुष्पदलांची दोन दोन वर्तुळे, ऊर्ध्वस्थ किंजदले सुटी, अनेक किंवा एक व प्रत्येकात एक बीजक, आठळीफळ Ranales
|