|
निंब कुल, मेलिएसी कडुनिंब, बकाणा निंब, निंबारा, तूण, मॅहोगनी, लाल चंदन इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश भांड गटात (जिरॅनिएलीझमध्ये) बेंथॅम व हूकर (आणि एग्लर व प्रँटल) यांनी केला आहे. परंतु हचिन्सन यांनी निंब कुलाला निंब गणाचा दर्जा दिला आहे. प्रमुख लक्षणे- झुडपे किंवा वृक्ष, पाने बहुधा पिसासारखई संयुक्त, फुले द्विलिंगी, संदले व प्रदले क्वचित जुळलेली, बहुधा केसरदलांची नळी अथवा पाच, सुटी, पाच किंवा कमी, जुळलेल्या ऊर्ध्वस्थ किंजदलांच्या किंजपुटात अनेक कप्पे व प्रत्येकात १- बीजके, किंजल एकच, फळे विविध, बिया एक किंवा अनेक.
|