|
माधवी कुल, माल्पिघिएसी बागेतील शोभिवंत माधवी लता (मधुमालती) लाल बोर, गाल्फिमिया इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे एक मोठे कुल, याचा अंतर्भाव भांड गणात (जिरॅनिएलीझमध्ये) करतात, हचिन्सन यांनी माल्पिघिएलीझमध्ये (माधवी गणात) केला आहे. प्रमुख लक्षणे- लहान वृक्ष, झुडपे व महालता (अंतर्रचना अनित्य). पाने साधी, सोपपर्ण, बहुधा समोरासमोर, अनेकांत प्रपिंडयुक्त ठिपके असलेली, विशिष्ट प्रकारचे शाखित केस सर्वत्र, एकसमात्र, द्विलिंगी, पंचभागी फुले, बहुधा १० केसर दलांची दोन मंडले तळाशी एका वर्तुळात जुळलेली, पाकळ्या पाच, सुट्या, तीन ऊर्ध्वस्थ जुळलेल्या किंजदलांच्या संयुक्त किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात एक बीजक, तीन फलांश होऊन फुटणारे शुष्क (पालिभेदी) फळ, अनेकदा पंखयुक्त कृत्स्नफल, बी अपुष्क
|