|
मुग्दल शेवाळी वर्ग, लायकोपोडीनी, लेपिडोफायटा नेचाभ पादपांच्या (टेरिडोफायटा) चार वर्गांपैकी एक, यात पाच गण आहेत लायकोपोडिएलीझ, सिलाजिनेलेलीझ, लेपिडोंडेंड्रेलीझ, लेपिडोकार्पेलीझ व आयसॉएटेलीझ. मुग्दलाच्या (गदेच्या) आकाराचे शंकु व काहींत शेवाळीसारखी पाने यावरुन मुग्दल शेवाळी हे नाव. काही जाती प्राचीन म्हणून जीवाश्मरुपातच व इतर अनेक विद्यमान वनश्रीत आढळतात. बीजुकधारी पिढी प्रमुख व तिला मूळ, खोड व बहुधा लहान पाने एकाआड एक असतात, रंभ विविध, पर्णविवरांचा अभाव, बीजुककोश अक्षसंमुख (पानांच्या किंवा तत्सम उपांगंच्या तळाशी) व एक, पाने कधी जिव्हिकावंत, कधी मोठी व समोरासमोर, काहींत दोन प्रकारचे बीजुककोश, गंतुकधारी पिढी बहुधा ऱ्हसित, रेतुकाशये व अंदुककलश, काहींत ऱ्हास पावलेल्या स्वरुपात, फलन पाण्याद्वारे होते. काही शास्त्रज्ञ नेचाभ पादपांच्या विभागात लायकोपोडिएलिझ हा एक गण म्हणून समाविष्ट करून त्यात वरील गण कुलस्वरुपात ठेवतात. लायकोपोडिएसी कुलात लायकोपोडियम व फायलोग्लॉसम हे दोनच वंश विद्यमान वनस्पतीत आढळतात. लायकोपोडियम याच्या हरिणाच्या शिंगासारख्या शंकुयुक्त भागामुळे त्याला 'मृगशृंग शेवाळ' (Staghorn Moss) म Club-mosses, Lepidophyta
|