|
अतसी कुल, लायनेसी (लिनेसी) अतसी (जवस, अळशी) रॅडिओला, ह्यूगोनिया इ. द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल, याचा अंतर्भाव भांड गणात (जिरॅनिएलीझमध्ये) केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- एकाआड एक साध्या पानांच्या औषधीय वनस्पती, द्विलिंगी, नियमित, ४- भागी, बिंबहीन फुले, केसरदले ५-२० व तळाशी जुळलेली, जुळलेल्या २- किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटातील प्रत्येक कप्प्यात १- बीजके. बोंड किंवा मृदुफळ, बी सपुष्क Geraniaceae lineae
|