|
तमाल कुल, लॉरेसी पिसी, मैदालकडी, तमाल, दालचिनी, कापूर, लॉरेल, ऍव्होकॅडो इत्यादी द्विदलिकित उपयुक्त वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव एंग्लर व प्रँटल यांनी व बेसींनी मोरवेल गणात (रॅनेलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- एकाआड एक, सोपपर्ण व चिवट पानांचे वृक्ष व झुडुपे, तैल नलिकायुक्त अवयव, अरसमात्र, अप्रदल, त्रिभागी, द्विलिंगी किंवा एकलिंगी फुले, परागकोश झडपांनी उघडतात. किंजदले १-३, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व एक बीजक, मृदुफळात अपुष्क बीज
|