|
तुलसी कुल, लॅबिएटी (लॅमिएसी) तुळस, सब्जा, पुदीना, फांगळा, पाच, दीपमाळ, माइनमूळ, सॅलव्हिया इत्यादी परिचित द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याता अंतर्भाव बेसी व हचिन्सन यांनी लॅमिएलीझ गणात केला आहे. प्रमुख लक्षणे- चौकोनी खोडाची क्षुपे व औषधी, पाने व खोडावर तैलप्रपिंडे, पाने साधीस समोरासमोर, लहान पुंजक्यासारखे अनेक फुलोरे असलेले मोठे फुलोरे, संवर्त व पुष्पमुकुट दोन ओठासारखे (द्वयोष्ठक) केसरदले चार किंवा दोन व पाकळ्यास चिकटलेली, ऊर्ध्वस्थ, दोन किंजदलांच्या किंजपुटात चार कप्पे व प्रत्येक कप्प्यात एक बीजक, किंजाच्या तळातून किंजलाचा उगम असून फळात (चार कपालिकात) चार बीजे असतात. Lamiaceae
|