-
पु. घाय . १ शस्त्र , हत्यार , इ० कानी केलेला प्रहार ; वार ; तडाखा ; आघात . म्हणौनी नीसाना घावो दीधला । - उषा ८१७ . अशा तुळतुळीत आणि तेजस्वी शरीरावर घाव करण्यास आपला कांहीं हात वाहयाचा नाहीं . - नि १७० . २ ( शस्त्र , हत्यार इ० कांच्या प्रहारानें झालेली ) जखम ; व्रण ; घाय ; क्षत . ३ ( व्यापारांत झालेलें ) नुकसान ; तोटा ; बूड ; ( धंद्यांत बसलेला ) धक्का ; ठोकर . ( क्रि० बसणें ; लागणें ; पडणें ; भरणें ). [ सं . घात ; प्रा . घाय ; सिं . घाड ] ( वाप्र . ) घाव लावणें - ( बायकी ) ( एखाद्या पदार्थाला , धान्याला ) उखळींत घालून हळू हळू कांडणें . ( निशाणीं ) घाव घालणें - १ युध्दारंभनिदर्शक दुंदुभि वाजविणें ; शत्रूवर चढाई करून जाणें . घाव तेव्हां घातला निशाणीं । तेणें दुमदुमली अवनी । - ह २२ . २४ . २ ( कपडे धुतांना ) आपटणें ; चोपणें ; धुणें . पडदाणीचा घातला घाव । - मसाप २ . २२ . म्ह० १ एक घाव दोन तुकडे = एखाद्या वादग्रस्त प्रकरणाचा एका झटक्यासरशीं - तडाख्यासरशींनिकाल लावणें . काय ? एक घाव दोन तुकडे करा ! - धनुर्भंग ९८ . २ टांकीचे घाव सोसल्यावांचून देवपण येत नाहीं = दगडाला टाकीनें घडून देवाच्या मूर्तीचा आकार आणतात , यावरून अनेक अडचणी , कष्ट , संकटे सोसल्याशिवाय वैभव प्राप्त होत नाहीं .
-
ना. आघात , तडाखा , प्रहार , फटका , वार .
-
निशाणी घाव घालणें
-
१. युद्धारंभी दुंदुभी वाजवणें. ‘घाव तेव्हां घातला निशाणी। तेणें दुमदुमली अवनी।’ -ह २२-२४. २. डंका वाजविणें
Site Search
Input language: