|
वृंदार (कोकम) कुल, गटिफेरी (क्लुसिएसी) सुरंगी, कोकम, नागचाफा, आमली, ऊंडी (पुन्नाग) ओट इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश कोकम (वृंदार) गणात (गटिफेरेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- पिवळट किंवा हिरवट चीक असलेले वृक्ष किंवा झुडपे, पाने साधी, बहुधा समोरासमोर तैल प्रपिंडयुक्त व चिवट, फुले एकलिंगी, द्विलिंगी, अवकिंज व एकाच किंवा भिन्न झाडांवर, संदले व प्रदले २- सुटी, क्वचित पाकळ्या नसतात. केसरदले अनेक, सुटी, क्वचित जुळलेली, किंजपुटात एक किंवा अनेक कप्पे, मृदुफळ किंवा न तडकणारे फळ, बीजे मोठी व अपुष्क Clusiaceae
|