|
शिलापुष्प कुल, जेस्नेरिएसी पाथरफोडी (शिलापुष्प) जेस्नेरिया डग्लसी इ. वनस्पतींचे (बियात दोन दलिका असलेल्या फुलझाडांचे) कुल, याचा अंतर्भाव पर्साएनेलीझ गणात करतात. प्रसार - उष्ण व उपोष्ण कटिबंध, प्रमुख लक्षणे- औषधी झुडपे, वृक्ष, वेली व काही अपि वनस्पती, पाने साधी, समोरासमोर, क्वचित थोडीफार विभागलेली, फुलोरा कुंठित, किंवा फुले एकेकटी, ती द्विलिंगी, पंचभागी, आकर्षक, संदले जुळलेली व तशीच प्रदले, केसरदले दोन, चार किंवा पाच, पाकळ्यांस चिकटलेली, किंजदले दोन, ऊर्ध्वस्थ, क्वचित अधःस्थ व जुळलेली, किंजपुटात एक कप्पा व अनेक बीजके, मृदुफळ किंवा शुष्कफळ (बोंड) बिया लहान, असंख्य, बाम्ही कुल, टेटुकुल व बंबाखू कुल याशी साम्य, पाथरफोडी औषधी आहे. ग्लॉक्सीनिया, जेस्नेरिया यांच्या जाती बागेत लावतात.
|