Dictionaries | References
f

Fumariaceae

   
Script: Latin

Fumariaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
पर्पटकुल, फ्यूमॅरिएसी
फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गातील पर्पट, भूतकेशी, मामिरान इत्यादी वनस्पतींचे कुल. याचा अंतर्भाव ऱ्हीडेलीझ ह्या गणात करतात. प्रमुख लक्षणे- पाण्याचा अंश अधिक असलेल्या औषधी, क्वचित वेलीसारख्या, पाने साधी, बहुधा एकाआड एक, मूलज किंवा स्कंधेय, कधी फार विभागलेली व काहीशी समोरासमोर, फुले द्विलिंगी, एकसमात्र, परिदले तीन मंडलात असून संदले दोन, प्रदले चार, केसरदले सहा व किंजपुटाच्या दोन्ही बाजूस तीनच्या गटात व जुळलेली, किंजदले दोन, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात दोन किंवा अनेक बीजके. फळ (बोंड) तडकणारे किंवा कपाली, बी एक किंवा अनेक. पर्पट अगर पित्तपापडा (Fumaria parviflora L.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP