|
छदमी, आभासी, खोटे खऱ्याचा फक्त भास उत्पन्न करणारा अवयव f.axis छदमी अक्ष अनेक उपाक्षांचा बनलेला, पण एक दिसणारा अक्ष f.fruit छद्मफल, आभासी फल भोंदू फळ, किंजपुटापासून न बनता इतर भागांपासून (देठ, पुष्पस्थली, पुष्पदले इ.) बनलेले व सामान्यपणे फळ मानले गेलेले उदा. काजू किंवा बिब्बा यांचे मांसल देठ पहा pome f. indusium छदमी पुंजत्राण काही नेचांतील पानांची कडा दुमडुन बनलेले बीजुककोश पुंजावरचे संरक्षक आवरण उदा. टेरिस वंश f. parenchyma छदमी मृदुतक आधी स्वतंत्र असलेल्या कोशिका (किंवा तंतू) नंतर एकत्र येऊन त्यांचा ऊतकासारखा बनलेला समूह, उदा. भूछत्राचा दांडा, छत्र, अर्गटचे जालाश्म इ. पहा ergot, sclerotium
|