-
स्त्री. १ गवत वगैरेचा तुकडा - दांडा ; तृणाची काडी न मिळे । उष्णें झाडोरे करपले । ' - भावार्थ रामायण बाल १ . ७९ . २ लांकडांची काटकी , शिरपूट , धातूचा बारीक लांबट तुकडा , आगकाडी इ , ( ल .) काडीच्या मोलाची अथवा आकाराची वस्तु , ' जीवानें शिंपिला तिडपिडी । बिजिला प्राण सांडी । लागला तरी काडी । उरों नेदी । ' ०ज्ञा १३ . ७२० . ' काडीचोर तो पाडीचोर '= काडी ( क्षुल्लक वस्तु ) चोरल्याचें एकदां सिद्ध झालें म्हणजे पुढें त्याने पाडी ( वासरूं ) सारखी मोठी अस्तु चोरली असा आळ साहजिकच येतो . क्षुल्लक अपराध करणारा माणूस मोठा अपराधहि करतो . ( कष्ठ ) ३ ( जरीची किंवा रेशमाची या शब्दाच्या पुढे काडी आली असतां ) जरी - रेशमी - कांठ ( वस्त्रांचा ) किंवा बस्त्रावरची पट्टी , वीण असा अर्थ होतो . ४ ( गंजिफा ) डाव जिंकणेंएका खेळाडुस सर्व पानें देण्याची पाळी येणें . क्रि . लागणें . ५ ( खा .) दिव्याची ( पणतीची ) ज्योत . ६ ( बुरुड काम ) बांबूची बारीक कांब ७ ( व . ना .) हातांतील टेकावयाची काठी . ८ ( व . ना .) सरपण ( अव ) काड्या . ९ गुरांचा चारा . ' जनावरांनी वैरण - काडीं देण्याचा हुकुम सोडला .' - कोकि ७३६ . १० ( गो .) बायकांच्या नाकांतील चमकी . ११ ( कु .) एक जातीचा मासा . याच्या अंगावर कांटे असून आकृती सर्पाप्रमाणें असते . म्ह० १ काडीची सत्ता लाखाची मत्ता = थोड्याशा अधिकारानें जें काम होतें तें पुष्कळशा पैशानें होत नाहीं . २ काडीपासून जोडावें लाखापासून मोडावें ( वाप्र .) ( आडवी उभी ) काडी ओढणें -( ल .) निषेधपर आडव्या उभ्या रेघा काधायला समर्थ नसणें . म्हणजे कांहिही अक्शर लिहितांन येणें अक्षरशत्रु .- ची आग माडीस लागणे - श्रेष्ठ माणसाला कनिष्ठ माणसांपासून किंवा एखाद्या क्षुल्लक कारणापासून अगर व्यक्तिकडुन उपद्रव होणें . - नें औषध लावणें - दुसर्याच्या जखमेला दुरून बोट न लावतां काडीनें औषध लावणें यावरुन , अंग राखुन काम करणें
-
०मोडणें मोडून देणें - क्रि . पार फाडुन देणें , पालव कापून देणें . विवाहसंबंध तोडून टाकणें . रद्द करणें .
-
०काडी जळणें ; राख होणें ; नाश पावणें , नाहिंसा होणे . ' नमुताईच्या संसारास काडी लागली .' - हाच कां धर्म - नाशिककर २५ .
-
लागणें जळणें ; राख होणें ; नाश पावणें , नाहिंसा होणे . ' नमुताईच्या संसारास काडी लागली .' - हाच कां धर्म - नाशिककर २५ .
Site Search
Input language: