|
संतानक कुल, एरिकेसी संतानक, गंधपुरा, ँड्रोमेडा, एरिका, कॅलूना, काऊबेरी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे मोठे कुल, याचा अंतर्भाव संतानक गणात (एरिकेलीझ) करतात. प्रमुख लक्षणे- मरुवासी लक्षणे असलेली झुडपे, बहुधा अवकिंज व जुळलेल्या पाकळ्यांची द्विलिंगी ४- भागी फुले, केसरदले ८-१०, बाहेरचे मंडल पाकळ्यासमोर, २-१ किंजदलांचा अनेक कप्यांचा बहुधा ऊर्ध्वस्थ किंजपुट, फळ विविध, परागकोशातील परागांच्या चौकड्या छिद्रावाटे बाहेर पडतात, बिया अनेक
|