|
टेंबुर्णी (तिंदुक) कुल, एबेनेसी टेंबुर्णी, काकी, तिमरु, तेंडू, अबुनस इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे कुल, याचा अंतर्भाव तिंदुक गणात (एबेनेलीझ) मध्ये करतात. बकुल कुलाशी (सॅपोटेसी) याचे निकट संबंध आहेत. प्रमुख लक्षणे- वृक्ष व झुडपे, साधी, अखंड व चिवट पाने, नियमित, बहुधा विभक्तलिंगी, सच्छदक, ३- भागी फुले, परिदले जुळलेली, संवर्त सतत राहणारा, पुष्पमुकुट संवलित, केसरदलांची दोन मंडले व तळाशी ती पाकळ्यास चिकटलेली, ऊर्ध्वस्थ किंजपुट, किंजदले २-१ व जुळलेली, मृदुफळ, क्वचित तडकणारे फळ, सपुष्क बिया
|