|
आलुक कुल, डायॉस्कोरिएसी कणगर, गोराडू, कारंदा इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे कुल, बेंथॅम व हूकर यांनी पलांडु गणात घातले आहे. प्रमुख लक्षणे- वेली, भूमिस्थित ग्रंथिल खोड व मुळे, साधी, एकाआड एक पाने (जाळीदार शिरांची) नियमित, एकलिंगी, त्रिभागी, लहान फुले भिन्न वनस्पतीवर असतात, अधःस्थ किंजपुटात १- कप्पे व प्रत्येकात बीजके, मृदुफळ किंवा बोंड, सपुष्क बी
|