|
चषिका कुल, क्युप्युलिफेरी जुन्या वर्गीकरणाप्रमाणे (बेंथॅम व हूकर) ओक (बंज) चेस्टनट, बीच इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल याचा अंतर्भाव बंज (ओक) गणात किंवा क्वर्सिफ्लोरीत केला जात असे. एंग्लर व प्रँटल यांनी या कुलाला गणाचा (फॅगलीझ) दर्जा दिला आहे व भूर्ज कुल (बेट्युलेसी) आणि ओक कुल किंवा बंज कुल (फॅगसी) अशी दोन कुले त्यात समाविष्ट केली आहेत. अलिकडे फॅगेसी म्हणजेच चषिका कुल (क्युप्युलिफेरी) असे मानतात. प्रमुख लक्षणे- वृक्ष व क्षुपे, साधी उपपर्णे असलेली, एकाआड एक पाने, नलकणिश फुलोरा, एकलिंगी, पण एकाच झाडावर, एक परिदलमंडल किंवा तेही नसलेली फुले, दोन किंवा तीन अधःस्थ किंजदलांच्या संयुक्त किंजपुटात प्रथम दोन किंवा तीन कप्पे व प्रत्येकात एक किंवा दोन बीजके, कपाली फळात एकच अपुष्क बीज. सपक्ष फळ (बीच) बीच, ऍल्डर, हॅझेल, हॉर्नबीम, ओक या सर्वांचा येथे समावेश आहे. Amentiferae Fagaceae
|