|
कर्कटी (काकडी) कुल, कुकर्बिटेसी लाल भोपळा, काकडी,कलिंगड, टरबूज इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश बेंथॅम व हूकर यांनी कृष्णकमळ गोत्रात (पॅसिफ्लोरेलीझ) एंग्लर व प्रँटल यांनी कर्कटी गणात (कुकर्बिटेलीझ) बेसींनी लोझेलीझ गणात व हचिन्सननी कर्कटी गणात केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- बहुतेक सर्व प्रतानयुक्त औषधीय वेली, साधी, एकाआड एक, हस्ताकृती शिरा असलेली पाने, अरसमात्र, अपिकिंज बहुधा आकर्षक, पिवळी किंवा पांढरी, एकलिंगी, एकाच झाडावर असणारी फुले, बहुधा संवर्त व पुष्पमुकुट पंचभागी, जुळलेल, घंटाकृती, केसरदले किंवा ५, परागकोश बहुधा जुळलेले, तीन जुळलेल्या किंजदलाच्या अधःस्थ किंजपुटात एक कप्पा व तटवर्ती अनेक बीजके, मृदुफळ pepo
|