|
मोहरी (सर्षप) कुल, क्रुसिफेरी (बॅसिकेसी) मोहरी (सर्षप) कोबी, नवलकोल, मुळा इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे कुल. याचा अंतर्भाव बेसींनी अहिफेन गणात (पॅपॅव्हरेलीझ) बेंथॅम व हूकर यांनी पराएटेलीझ गणात व हचिन्सन यांनी क्रुसिफेरेलीझ किंवा मोहरी (सर्षप) गणामध्ये केला आहे. प्रमुख लक्षणे - औषधीय वनस्पती, साधी एकाआड एक पाने, चतुर्भागी, स्वस्तिकाकृति, नियमित, अवकिंज, द्विलिंगी फुले, केसरदले सहापैकी चार लांब, दोन जुळलेल्या किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात तटवर्ती बीजकविन्यास व छद्मपटलामुळे दोन कप्पे, फळ शुष्क (सार्षप) व दोन्ही शिवणीवर तडकणारे, अनेक बीजी siliqua parietal replum Brassicaceae
|