|
हरिणपदी (गंधवेल) कुल, कॉन्व्हॉल्व्ह् युलेसी अमरवेल, गारवेल, रताळे, गणेशपुष्प, मर्यादवेल, विष्णुकांता, हरिणपदी (Convolvulus arvensis L.) इत्यादी अनेक द्विदलिकित वनस्पतींचे कुल. बेसींनी या कुलाचा अंतर्भाव पोलेमोनिएलीझ या गणात तर हचिन्सननी धोतरा या गणात (सोलॅनेलीझ) केला आहे. या कुलाची लक्षणे- वेली, काही वर चढणाऱ्या तर काही जमिनीवर पसरणाऱ्या, एकाआड एक साधी पाने, कुंठित फुलोरा, अरसमात्र, नियमित, पूर्ण, द्विलिंगी, अवकिंज, मोठी, पंचभागी, आकर्षक, घंटाकृति किंवा नाळक्यासारखी, जुळलेल्या पुष्पमुकुटाची फुले, दोन जुळलेल्या किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात २- कप्पे आणि प्रत्येकात २- बीजके, मृदुफळ किंवा बोंड
|