|
शंकुमत वर्ग, कॉनिफेरी प्रकटबीज वनस्पतींपैकी शंकुधारी वनस्पतींचा वर्ग, काहींनी हा उपवर्ग मानला तर काहींनी गण (कॉनिफेरेलीझ) मानला आहे. या गटातील काही विलुप्त (निर्वेश) व प्राचीन तर काही विद्यमान वनस्पतींची कुले असून एकंदरीत त्यंआची लक्षणे प्रारंभिक आहेत. काहींच्या मते त्यांच्यापैकीच काही प्राचीन पूर्वजांपासून फुलझाडे (आवृतबीज वनस्पती) अवतरली असावी. वर उल्लेख केलेल्या शंकुधारी वनस्पतीशिवाय यू (बिर्मी) लार्च, देवदार, थुजा, स्पूस इत्यादींचा यात समावेश होतो. हे बहुतेक सर्व उंच, सदापर्णी व मोठे वृक्ष असून समशीतोष्ण व थंड हवेत त्यांची जंगले आहेत. कित्येकांची पाने सुईसारखी, खवल्यासारखी अथवा रेषाकृती व काहीशी रुंद असतात. बहुधा दोन प्रकारचे (लघुबीजुकपर्णे व गुरुबीजुकपर्णे असणारे, यांनाच कोणी अनुक्रमे केसर पुं-शंकू आणि किंज स्त्री शंकु म्हणतात) शंकू एकाच झाडावर, क्वचित भिन्न झाडांवर येतात. शंकू हा काहींच्या मते फुलोरा व काहींच्या मते फूल याशी तुल्य आहे. त्यामुळे व फुलातील केसरदले व किंजदले यांचे कार्य करणारे अवयव त्यात असल्याने लिंगवाचक विशेषणे वापरतात. फुलातील किंजदलाप्रमाणे या शंकूपासून खरी फळे बनत ना Gymnospermae.
|