|
हरित शैवल वर्ग फक्त हरितद्रव्य असलेला व कायक वनस्पतींपैकी एक शैवल गट, आधुनिक वर्गीकरणपद्धतीप्रमाणे हरित शैवल विभागाचे (क्लोरोफायटा) हरितशैवल व कांडशरीरिका (कारेसी, कॅरोफायसी) असे दोन वर्ग मानतात. प्रमुख लक्षणे - एककोशिक किंवा अनेककोशिक, अनेक कोशिकातील वाढ अग्रस्थ कोशिकाद्वारे नसते, प्रजोत्पादक अवयव एककोशिक किंवा अनेककोशिक, अनेक कोशिकातील वाढ अग्रस्थ कोसिकाद्वारे नसते, प्रजोत्पादक अवयव एककोशिक व मुक्तपणे विखुरलेली, फलनानंतर वंध्य कोशिकांचे आच्छादन अपवादात्मक, शरीर कोशिकासमूहाचे, तंतुमय, पसरट, पोकळ किंवा भरीव नळीप्रमाणे (कायकाभ) अलिंग प्रजोत्पादन बीजुकाद्वारे आणि सलिंग प्रजोत्पादन सम किंवा असम गुंतकाद्वारे होते. Chlorophyta Characeae (Green algae)
|