c

Cactaceae

Bot. (a family) कॅक्टेसी (स्त्री.) (कॅक्टेसी कुल)
नागफणा कुल
कॅक्टेसी
नागफणा कुल, कॅक्टेसी
नागफणा व काही निवडुंगाच्या जाती ह्या फुलझाडांचे (द्विदलिकित) कुल. बेंथॅम आणि हूकर यांनी याचा अंतर्भाव फायकॉइडेलीझ या नावाच्या गणात व एंग्लर आणि प्रँटल यांनी नागफणा गणात (ऑपन्शिएलीझ) केला आहे.
प्रमुख लक्षणे - बहुतेक सर्व काटेरी, पर्णहीन व मांसल लहानमोठ्या मरुवनस्पती, अर्धचक्रीय, अग्रपश्च किंवा अरसमात्र, द्विलिंगी फुलात संवर्त व पुष्पमुकुट यातील दले अनेक, सर्पिल व संक्रमक तसेच केसरदले व किंजदले अनेक, किंजपुट अधःस्थ, एकपुटक व त्यात अनेक तटवर्ती बीजकाधानी, मृदुफळ, सर्वत्र काट्यांचे झुबके, बागेला कुंपणाकरिता व काही जाती शोभेकरिता लावतात.

Related Words

Cactaceae   
: Folder : Page : Word/Phrase : Person