|
केसरा कुल, बिक्सेसी केसरी (कडुकवीठ) बिक्सा व इतर दोन वंशांतील जातींचे फार लहान द्विदलिकित वनस्पतींचे कुल, प्रमुख लक्षणे- वृक्ष व झुडपे, सोपपर्ण, अखंड, एकाआड एक पाने, द्विलिंगी पंचभागी फुले, केसरदले अनेक, ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात अनेक बीजके, बोंडात अनेक सपुष्प बिया असतात. केसरी (Bixa orellana L.)
|