-
पु. १ कचेरीतील मुख्य अधिकारी , देखरेख करणारा , पाहणी करणारा ; खात्याचा मुख्य ; पैरवी करणारा अधिकारी ; मुकदम . महमद - पन्हा दारोगा हर्कार्याचा यास हुकूम जाला . - रा ७ . १०० . २ सार्याचा पैसा देण्यापूर्वी ( चुकता होण्यापूर्वी ) शेतांतील उत्पन्न काढून नेण्यास प्रतिबंध करण्याकरितां नेमलेला अधिकारी ; पोलिसांचा मुख्य अधिकारी ; कोतवाल . ३ देखरेख ; व्यवस्था ; पाहणी ; ताबा ; हुकमत . [ फा . दारुघा ] दरोगेगिरी - स्त्री . दरोग्याचा अधिकार , काम .
-
The head man of an office, a superintendent, overseer, inspector, director.
-
पु. १ दरोगा ( सर्व अर्थी ) पहा . २ दरोग्याचे काम ; देखरेख ठेवण्याचा अधिकार . [ फा . दारुघा ; बं . दारोगा = पोलीस अधिकारी ] दारोगगी , दारोगी - स्त्री . दारोग्याचे काम ; आधिपत्य . नजीबखानास तोफखान्याची दारोगी सांगावी . - रा ६ . ४८३ . [ दारोगा ] दारोगेगिरी - स्त्री . दारोगेगिरी पहा . [ दारोगा ]
-
m The headman of an office, a superintendent, an overseer.
Site Search
Input language: