Dictionaries | References b Balsaminaceae Script: Latin Meaning Related Words Balsaminaceae राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 तेरडा तेरणा कुल, बाल्समिनेसीरिठा (्अरिष्ट) गणातील फुलझाडांचे एक लहान कुल, याचा समावेश हचिन्सन यांनी हल्ली जिरॅनिएलीझमध्ये (भांड गणात) केला आहे. बेंथॅम व हूकर यांनी यातील वनस्पतींचा समावेश जिरनिएसी कुलात (भांड कुलात) केला आहे. तेरडा कुलात दोन वंश व सुमारे ४३० जाती अंतर्भूत असून त्या ऊष्ण कटिबंधीय आशिया व आफिका येथे आढळतात. प्रमुख लक्षणे - औषधी, पाने साधी व एकाआड एक, फुले द्विलिंगी व एकसमात्र, पाच पाकळ्यांपैकी बाजूच्या दोन दोन जुळलेल्या, केसरदलांचे फक्त परागकोश जुळून किंजपुटावर त्यांचे टोपीसारखे झाकण बनलेले, पाच जुळलेल्या किंजदलांच्या उर्ध्वस्थ किंजपुटात पाच कप्पे व अनेक बीजके, बोंड तडकून अपुष्क बीजे फेकली जातात, तेरडा ही सामान्य वनस्पती जंगलात व बागेत आढळते.Balsamaceae Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP