-
न. १ स्थापना ; आधान ; स्वाधीन करणें ; ठेवणें ; कर्तव्य . तेथें राजा कौंडण्यपती । विधान स्थिति करितसे । - एरुस्व ५ . १४ . पलंगीं पुतळयाचें करा ग विधान । - प्रला १३९ . २ सांगणें ; कथन ; अस्तिनास्ति पक्षीं म्हणणें मांडणें . धर्मशिक्षणाची आवश्यकता नाहीं असें बेधडक विधान करणें या सारखें धाडस नाहीं . - केले १ . १४९ . ३ आदेशणें ; नियम घालणें , स्थापित करणें . ४ आज्ञा ; नियम ; अनुशासन . मनुष्यावाचूनि विधाना । विषय नाहीं । - ज्ञा १५ . १७८ . ५ ( कार्यास , कृत्यास , कामास ) लावणें ; नेमणूक ; योजना . जे ते वैदिक विधानीं । योग्य म्हणौनि । - ज्ञा १८ . ८१९ . ६ विधि ; पध्दति ; क्रिया . उदा० पूजाविधान ; होम विधान ; व्रत विधान . यज्ञीचें विधान सरे । - ज्ञा ४ . १५० . प्रायश्चित्ताची विधानें । सांगेन ऐका स्थिर मनें । - गुच २८ . ८० . ७ ( व्या . ) उपसर्गं , प्रत्यय लावणें . [ सं . धा = ठेवणें ]
-
ना. निश्चित कथन , मांडणे ;
-
ना. नियम , पद्धती ;
-
. 6 A rule, law, prescription of or for; as पूजाविधान, होम- विधान, व्रतविधान. 7 In grammar. Putting as an affix or a prefix, affixing, prefixing.
Site Search
Input language: