|
तापमारी, कुल, ऍरेलिएसी तापमारी (ऍरिलिया) फॅटसिया, पॅनॅक्स, हेडेरा इत्यादी उद्यानवनस्पतींचे लहान कुल, याचा समावेश चामर गणात केला जातो. प्रमुख लक्षणे - वृक्ष, झुडुपे, वेली, राळनलिकायुक्त, पाने साधी किंवा संयुक्त, फुलोरे चामरकल्प किंवा स्तबक, फुले द्विलिंगी, अपिकिंज, पंचभागी, पाच जुळलेल्या किंजदलांचा अधःस्थ किंजपुट (क्वचित ऊर्ध्वस्थ) कप्पे पाच व प्रत्येकात एक बीजक, बहुधा अश्मगर्भी फळ, सपुष्प बीजे Umbelliflorae (Umbellales)
|