|
करवीर कुल ऍपोसायनेसी कण्हेर (करवीर) कुटज (कुडा) तगारी, पांढरा चाफा, करवंद, सातवीण इत्यादी फुलझाडांचे (द्विदलिकित) कुल. या कुलाचा अंतर्भाव बेसींच्या पद्धतीत किराइत गणात (जेन्शिएनेलीझ) केला असून हचिन्सन यांनी करवीर गणात (ऍपोसायनेलीझ) केला आहे. या कुलाची प्रमुख लक्षणे - दुधासारखा चीक, साधी पाने बहुधा समोरासमोर किंवा मंडलित, पूर्ण, नियमित, द्विलिंगी फुले, जुळलेल्या चार ते पाच पाकळ्या व त्यास चिकटलेली, सुटी, चार ते पाच केसरदले, ऊर्ध्वस्थ सुट्या किंवा जुळलेल्या दोन किंजदलांचे किंजमंडल, फळे विविध, पंखयुक्त किंवा केशयुक्त (कधी साध्या) बिया
|