|
घायपात कुल, ऍगॅव्हेसी घायपात गणातील एक कुल (एकदलिकित फुलझाडे) अरुंद, लांबट किंवा भाल्यासारख्या पानांचा झुबका खोडाच्या टोकावर राहतो, फुलातील परिदले शुष्क नसून बहुधा ती जुळून नलिका बनते, किंजपूट ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ, इतर लक्षणे पुढे घायपात गणात दिल्याप्रमाणे, उदा घायपात, दर्शना, युका, नागीन, फर्क्रिया इत्यादी.
|