-
पु.
-
पु. १ संधि ; वेळ ; संभव ; शक्यता . पाऊस पडण्याचा लाग दिसतो . आंबे पिकायचे लागास आले म्हणजे काढावे . झाडी जेव्हां तोडली तेव्हां किल्ल्याजवळ जायास लाग झाला . २ मनांतील संधान उमेदीची दिशा ; प्रयत्न ; नेम ; खटाटोप ; खटपट ( क्रि० करणें ). चाकरीसाठी बहुत लाग केले परंतु एकही चालला नाही . तुझा अश्व धरुनिया याग । हंसध्वज करी सांग । परी सोडवावयाचा तुझा लाग । येथें कांही न चाले। जै १९३१ . राजदूत पावले लागा। - मुआदि २५ . ६ . ३ ध्येय , विषय ; हेतु ; उद्देश ; मनुष्य ज्याचा पाटलाग करतो ती वस्तु ( क्रि० धरणें ; बांधणें ). उदा० लाग साधला = हेतु साधला ; कार्य यशस्वी झालें . याच्या उलट लाग फसाला , एक लाग आला आहे . = कांहीं तरी मिळण्याचा संभव आहे किंवा प्रयत्नास जागा आहे . तो लागावर चालला . हा लाग योजून जातो इ० ४ एखाद्यावर ओढवलेलें संकट ; दुर्दैवाचा प्रसंग ; हल्ला ; घाला . आजपावेतोम दोन तीन लाग निभावले , आतां हा लाग कठीण . जीववरचा लाग . ५ हल्ला ; झपाटा ; तडाखा . सांडी सांडी भीमकीचा संग । अबद्ध बाधिजसी निलाग । आला कोपिष्टांचा लाग । पडेल पांग दुजयाचा। - एउरस्व ८ . २३ . ६ पीक , बहार , झाड , शेत इ० पासून फळें , धान्य इ० रुप प्राप्ति . इरसाल झाडास लाग कमी असतो . ७ फळें आणि बहर येण्याची वेळ ; योग्य काल ; हंगाम ; फलादी रुप उत्पन्न करण्याची वृक्षादींची स्थिति . नारळ , माड लावळ्यापासून दहाव्या वर्षी लागास येतो . ८ दांडा ; जहाज किनार्यास येऊन लागतें ती जागा ; जहाज होडी इ० चा तळ जेथें जमिनीस लागतो ती जागा . ९ चोळीला कांखेंत ठुशीखालीं द्यावयाचा जोड , तुकडा . १० पकड ; कैंची ; तिढा ; टेकण ; आश्रय ; आधार ; जागा ; पाया ; धर ( जड वस्तु वर ठेवण्याकरितां ). ह्या खांबाला हा घोंडा लाग म्हणून पुरे . ११ पदार्थाचा मादक गुण ; तंबाखू इ० पदार्थाचा अंमली गुण . सुपारी खाल्ली असतां ती कांहींना लागते तेव्हांचा मदांश . १२ जनावराला एखाद्या ठिकाणीं होणारा रोग . तोंडलाग , पायलाग . १३ मारा ; स्पर्श ; पोंच ; पल्ला ( बंदूक , तोफ इ०चा ). बंदुकीचा तोफेचा - तिराचा - गोळीचा - कमानीचा - लाग १४ शिकार ; लूट ; प्राप्ति ; लग्गा . आम्ही तिघेजण संकेताप्रमाणें लाग लागेल तर पहावा म्हणून शहरांत जाण्यास निघालों . - विवि ८ . ११ . २०३ . १५ पत्ता ; शोध ; तपास ; पाठलाग . लाग प्रसेनतनुचा लावी हरिचाहि मग महाभाग। - मोकृष्ण ८३ . १११ . - ऐपो १५९ . १६ विशिष्ट गात्र , इंद्रिय इ० ची विकृति १७ स्थिति ; अवस्था . निरितामागें बैसला वाघु । अथवा पुढें आला स्वर्ग भोगु । त्यासि नाहीं रागविरागु तैसा कठिण लागु । नाशासि मूळ स्त्रीसंगू। - एभा ८ . ६९ . १९ आवड ; प्रीति . तैसा जाहला प्रसंगु । जे ज्ञानी आम्हासि लागु । आणि तुजही अनुरागु । अथि येथ। - ज्ञा १३ . ६४४ . २० अधिकार . एअथ इंद्रियाचा पांगु जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथि लागु । परिसावया । - ज्ञा ५ . ६६ . २१ ( कों .) गवताच्या उत्पन्नकरितां राखून ठेविलेली डोंगराळ जमीन . लागाची कुपण धरण्याची वेळ झाली . २२ सामर्थ्य ; मगदूर . २३ सोय . कडावरुनि पाहिला लाग। - दावि २१८ . २४ रीघ ; वाट , २५ युक्ति . हा बाहेर निघोन येई असा लागेच ना लाग तो। ०र ५७ . २६ मिलाफ . तुम्हा उभएता लाग लागोम हे ना । सेवितां मी। ०ऋ८१ . २७ ( व .) पशुपक्ष्याअदिकांचें मैथुन ; कावळा , सर्प इ०ची सुरतक्रीडा . कावळ्यांचा लाग पाहिला . २८ ( जरकाम ) तारेची दिशा बरोबर लावणारा , रुळ , २९ ( लोहारकाम ) मोठा अवजड हातोडा . रेवीट ( रिव्हेट ) फुलवितांना एका बाजूनें ठोकतात व दुसर्या बाजूस याचा जोर लावतात . ३० ( चांभारी ) अपुर्या सागळीस लागलेला तुकडा . ३१ ( संगीत ) एका स्वरावर थांबून मग दुसर्या स्वरावर उडी घेणें . (- स्त्री .) उदॆए ; उड्डाण ( क्रि०मारणें )- क्रिवि . एकामागून एक ; लागोपाठ ( लागलगट , लागट या अर्थी ). [ संलग् - लग्न ; प्रा . लग्न ] ( वाप्र .) ०करणें - हल्ला चढविणें सर्वेंचि पिप्लिका करिती लाग । देखोनि माजला कीर्तनरंग। - दावि २६९ . ०चालविणें - ठरलेल्ल्या क्रमानें किंवा सरणींने चालू करणे . ( कांही काम योजना , बेत ). ०दवडणें - संधि घालविणें ; लाभ दवडणें . ०दवडणें - एखाद्या गोष्टीच्या सिद्धीसाठी आपल्या योजना चालू करणें , मागें लावण . ०लावणें०१ ( प्राप्तीसाठी ) संधान बांधणें ; कांही वशिला खर्च करणें ; हरएक प्रकारें उपाय , युक्ति योजून काम जुळेलसें करणें . २ माग काढणें ; पाठलाग करणें . मागोनि लाग लावित नृपबळ येउनि। ०मोआदि १५ . ६३ ( एखादें काम ) लागाला येणें - लागीं लागणें - लागावर येणें - मिळणें जुळणें - एखादें काम सुरळीतपणें सुरु होणें किंवा चालू लागणें , सिद्धीच्या मार्गावर असणें . पंथाला लागणें . माझी पंचायत लागीं लागली . लागास येणें - रंगारुपास , फलद्रुप होण्याच्या बेतांत येणें . सामाशब्द - ०पाठ - पु . स्त्री . १ लगबग . त्वरा ; घाई . करा करा लागपाठ। धरा पंढरीची वाट । - तुगा २५६४ . २ लागलेंच अनुसरण ; पाठलाग ; पाठपुरावा . ( क्रि० पुरवणें ; पुरणें ; लागणें ). ०पाळती -- स्त्री . पाठीस लागण्याची किर्या . किमर्थ अर्थी माझियें पृष्ठीं। लागपाळती केली त्वां - नव१३ . १३८ . ०बग०पु . संबंध . पाईक तो जाणे या इक्रीचा भाव । लगबग ठाव चोरवाट । - तुगा ३७५ . ०बंदी - वि . जीस लाग लावले आहेत अशी , चांगल्या प्रकारची ( चोळी ). नका सोडू तरी गांठ चोळी फाडाल लागबंदीची। - होला ९७ ०भोग - पु . १ संबंध ; लागाबांधा . निष्ठुरा उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचाचि । - तुगा १२१७ . २ पाठलाग . ०माग - पु . लागभाग ; उपाय . पराक्रमाचा लागमाग । क्षात्रकर्म किं कपटांग। - ज्ञानप्रदीप २८१ ०लाब्या - वि . युक्त्या , बेत वगैरे योजून काम साधणारा ; संधान बांधण्यात शल . ०वण - स्त्री . पाठलाग . साध्य साधूति अंजन । करी लागवण स्त्रियांसी । - एभा १० . ५७७ .
-
०वेग क्रिवि . घाई ; त्वरा ; लगबग .
-
संधि ; वेळ ; संभव ; शक्यता . पाऊस पडण्याचा लाग दिसतो . आंबे पिकायचे लागास आले म्हणजे काढावे . झाडी जेव्हां तोडली तेव्हां किल्ल्याजवळ जायास लाग झाला .
Site Search
Input language: