-
कर्दळ कुल, कॅनेसी
-
केवळ कर्दळीच्या वंशाचा (कॅना) अंतर्भाव करणारे एकदलिकित फुलझाडांचे लहान कुल, याचा समावेश बदली गणात (सिटॅमिनी) केला जातो परंतु हचिन्सन यांनी झिंजिबरेलीझ अथवा शुण्ठी गणात घातले आहे. प्रमुख लक्षणे- मूलक्षोडयुक्त औषधी, पाने साधी, मोठी, सच्छद फुलोरा, द्विलिंगी मोठी आकर्षक फुले, परिदले सहा, पाकळ्या तळाशी केसरदलाशी जुळलेल्या, केसरदले सहा, त्यापैकी पाच वंध्य व पाकळ्यासारखी, एकावर अर्धा कार्यक्षम परागकोश, किंजदले तीन, अधःस्थ व त्रिपुटक किंजपुटात अनेक अधोमुख बीजके, बोंडात सपुष्क बिया
-
Scitaminae
Site Search
Input language: