-
वि. १ गिळलेलें ; खाल्लेलें . सर्पानें मंडूक ग्रस्त केला . २ अक्षर , पद गाळून उच्चारलेलें ; खाल्लेलें ; गाळलेलें . ३ ( ल . ) गिळंकृत , आत्मसात केलेलें ; घालमेल - अफरातफर केलेलें . ४ व्यापलेलें . ५ गट्ट केलेला ; हरवलेला ; धरलेला ; मारलेला ; पीडिलेला ; त्रस्त झालेला अशा अर्थी समासांत योजतात ; जसें - कामग्रस्त = मदनानें तप्त ; चिंता - दारिद्रय - भूत - राहू - शाप - काल - भय - भार - रोग - शत्रु - संकट - व्याधि - ग्रस्त = चिंता , गरीबी इत्यादिकांनीं पीडिलेला . [ सं . ग्रस = भक्षण करणें ; ग्रस्त ] ग्रस्तास्त - पु . ग्रहण असतांनाच ( तें सुटण्यापूर्वी ) सूर्य किंवा चंद्र मावळणें . ग्रस्तोदय - पु . ग्रहण असतांना सूर्य किंवा चंद्र यांचा होणारा उदय .
-
ग्रस्त [grasta] p.p. p. p. p. [ग्रस् कर्मणि क्त]
-
वि. गट्ट केलेला , गिळलेला , धरलेला , पीडलेला , पीडाग्रस्त , व्यापलेला , हरवलेला .
-
Eaten, devoured.
Site Search
Input language: