-
वि. ( शब्दशः ) शिस्तीचा ; व्यवस्थित ; नियमित ; ऋजुमार्गी ; नियमाप्रमाणें चालणारा ; शिक्षित . ( रूढ ) विद्वान् ; सभ्य ; संभावित . २ उत्कृष्ट ; वरिष्ठ ; श्रेष्ठ ; आदरणीय ; पूज्य . ३ उर्वरित ; राहिलेला ; वाकीचा ; शेष . उदा० यज्ञशिष्ट ; हुतशिष्ट . हें शिष्ट मध्दन म्हणे धर्मात्मा भावितें चुकेल कसें । - मोसभा ४ . ५२ . [ सं . शिष् ] म्ह० शिष्टागमने अनध्यायः संभावित , पूज्य लोक आले असतां आपला व्यवसाय बंद , बाजूला ठेवावा .
-
०मंडळ न. प्रेषित किंवा प्रतिनिधीमंडळ . विनंति करण्याकरितां , भेट घेण्याकरितां , शिष्टाई करण्याकरितां पाठविलेली मंडळी . ( इं . ) डेप्यूटेशन .
-
०संप्रदाय पु. संभावित , श्रेष्ठ , पूज्य लोकांची रीत , मार्ग , पध्दति , वागणूक , चाल .
-
०सभा स्त्री. श्रेष्ठ , बडया , सन्मान्य लोकांची सभा , मंडळ , समाज .
Site Search
Input language: