-
उअ . जर या उभयान्वयी अव्ययाचे उत्तरगामी उभयान्वयी अव्यय . याचा अर्थ तसे झाल्यास , असल्यास , त्याअर्थी इ० ; बर्याच वेळा तर ह्या शब्दाचा वाक्यपूरक म्हणून उपयोग करितात . अशा वेळी त्या वाक्यांत कांही विशेष अर्थ व जोर येतो . जसे - हो ! आता मी जातो तर = मी सर्वथा जाणार नाही . कित्येक वेळा तर हा शब्द त्याने जोडलेल्या दोन वाक्यांच्या अर्थाचा विरोध दाखवितो . उदा० तुम्ही तर लाख रुपये मागतां व मी तर केवळ गरीब पडलो . याने संदीग्धता , अनिश्चियहि दाखविला जातो . उदा० मी ते नाटक पाहण्यास आलो तर येईन . मध्ये तर दिसते आहे , मध्ये तर आणू नका , लावू नका . या वाक्यातहि सापेक्षता , यदृच्छाघटित , सांकेतिकत्व निर्दिष्ट आहे . परंतु पहा . [ सं . तर्हि ]
-
विशेषणास लागणारा तारतम्यवाचक तद्धित प्रत्यय . उदा० गुरु = मोठा ; गुरुतर = अधिक मोठा . प्रियतर ; दृढतर . [ सं . ]
-
वि. ओले ; ताजे ; रसपूर्ण . तर मेव्याचे व खुश्क मेव्याचे खोन . - रा . १० . २९६ . [ फा . तर ]
-
स्त्री. १ ( हेट . कु ) होडी ; मचवा . तरी पहा . २ ( मचवा इ० काने उतरुन जाता येईल अशी ) खाडी . ३ ( नाविक कु . ) खाडीतील होड्य़ा लावण्याची किनार्यावरील सोईस्कर जागा , ठिकाण . ४ पलीकडील बाजू , तीर . अर बांधे तर बांधे । - वैद्यक ७६ . [ सं . तृ = तरणे ] ( वाप्र . ) तरीपार करणे - सक्रि . खाडीवरुन , समुद्रातून होडी इ० नी पलीकडे नेणे , पोहोचविणे .
Site Search
Input language: