-
न. १ डोळे दिपायाजोगें आकस्मिक तेज ; लख्खकन प्रकाश . ( क्रि० होणें ). प्रथम चक्क झालें एकदां मग कडकडून वीज पडली . २ आकस्मिक येणारा नवा विचार . विचार करतां करतां त्यास एकदम चक्क झालें . - सूर्योदय ८४ . - वि . १ सतेज ; प्रकाशमान ; लकाकणारा ; चकचकणारा ( सराफ लोक हा शब्द सोनें , रुपें , यांस प्रथम वापरीत , नंतर इतरांकडून तो पुढील अर्थी वस्त्रें , भूषणें , घर इत्यादींस लावण्यांत येऊं लागला ) लखलखीत ; नीटनेटका ; ठाकठीक ; सुरेख ; स्वच्छ ; चांगला ; झकास . त्यानें आपलें घर चक्क करून ठेविलें आहे . - वि . क्रिवि . आश्चर्यांत बुडालेला ; चकित त्याजवर जडलेल्या खडयाचें पाणी पाहून तो चक्कच झाला . - विवि १० . ५ ते ७ . १२६ . - क्रिवि . १ स्पष्टपणें ; डोळयासमोर ; धडधडीत . ती आपल्या प्रियकराला चक्क सांगते . - नाकु ३ . ४६ . २ पूर्णपणें पुरेपूर . आतां चक्क उजाडलें . मापटयाच्या भातांत दोघेजण चक्क जेवतील . [ सं . चक ; म . चकचक ]
-
०कर करकन करदिशीं चक्कन चक्कर - क्रिवि . चक्क होऊन ; डोळे दिपून जाण्याजोगा ; एकदम प्रकाश पडून ; झळाळून . आणि एकाएकीं चक्कन उजेड पडून मोठा गडगडाट होतो . - मराठी ६ वें पुस्तक . ( आवृ . २ ) पृ . ३६ . [ चक्क + कर प्रत्यय ]
-
वि. झकास , नीटनेटका , लखलखीत , लख्ख , स्वच्छ ;
-
वि. धडधडीत , स्पष्टपणे ;
Site Search
Input language: